Dr. Reema Kashiva

मधुमेह व्यवस्थापनामध्ये वैयक्तिकृत दृष्टीकोन महत्त्वाचा : तज्ञ

मधुमेह व्यवस्थापनामध्ये वैयक्तिकृत दृष्टीकोन महत्त्वाचा : तज्ञ
पुणे,12 नोव्हेंबर 2025 : औषधोपचाराच्या बाबतीतच नव्हे तर मधुमेह व्यवस्थापनामध्ये आहार आणि व्यायामाच्या बाबतीत देखील वैयक्तिकृत दृष्टीकोन महत्त्वाचा असल्याचे मत नोबल हॉस्पिटल येथील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबेटिस ॲन्ड ओबेसिटी विभागाच्या संचालिका डॉ.रीमा काशिवा यांनी व्यक्त केले.
अधिकाधिक तरुण लोक टाईप 2 मधुमेहाने ग्रस्त होत असताना त्याचे व्यवस्थापन नीट न केल्यास दीर्घकालीन गुंतागुंतीची जोखीम वाढू शकते.डॉ.काशिवा म्हणाल्या की,यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे लवकर मधुमेहाचे निदान करून लगेचच त्याचे व्यवस्थापन सुरू करणे.उदा.एखाद्याची एचबीए1सीची पातळी 6.5 ते 7.5 दरम्यान असेल आणि बीएमआय 35 असेल तर ते खाली आणण्याची ही योग्य वेळ असून त्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने योग्य व्यवस्थापन सुरू केले पाहिजे.
आपला आहार आणि व्यायाम कसा आहे,अशा साध्या साध्या गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.कधीकधी तोचतोच व्यायाम उपयुक्त ठरत नाही आणि म्हणूनच त्यात काही बदल आवश्यक असतात.याचा प्रभाव मधुमेहाची जोखीम वाढविणाऱ्या सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे आपल्या वजनावर पडू शकतो. आजकाल लहान मुले,किशोरवयीन व तरूण प्रौढांमध्ये टाईप 2 मधुमेहासाठी वजन ही एक मोठी जोखीम आहे.इतर जोखीमकारक घटकांमध्ये कामामुळे येणारा तणाव,मुलांमध्ये कामगिरीचा तणाव इत्यादींचा समावेश असून याबाबत शाळेतच जागरूकता निर्माण झाली पाहिजे.या जोखीमकारक घटकांमध्ये वाढणारा स्क्रीन टाईम, कमी होत चाललेले मैदानी खेळ व कमी होत चाललेल्या एकमेकांच्या प्रत्यक्ष भेटी-गाठी भर घालत आहेत.
ग्रामीण भागातील मधुमेहींना टेलिमेडिसिनची मदत होऊ शकते.
फक्त शहरी भागात नाही तर ग्रामीण भागात देखील मधुमेह झपाट्याने वाढत आहे.कोविड काळात व्यापकपणे वापरले गेलेले टेलिमेडिसिन येथे महत्त्वाची भूमिका बजावू शकते.प्राथमिक केंद्रांमधील चिकित्सकांना योग्य माहिती व प्रशिक्षण आणि ग्रामीण भागातील मधुमेहींना एकत्रितपणे समुपदेशन हे टेलिमेडिसिनद्वारे होऊ शकते.यात जोखीमकारक घटक,लक्षणे आणि मधुमेहाच्या इतर पैलूंबाबत माहिती दिली जाऊ शकते.गरज पडल्यास त्यांना टर्शरी केअर युनिटसमध्ये उपचारासाठी आपण पाठवू शकतो.
डॉ.रीमा काशिवा म्हणाल्या की,यावर्षीची संकल्पना डायबेटिस ॲन्ड वेलबिंग असून फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक,सामाजिक व आर्थिक अशा संपूर्ण कल्याणाबाबत महत्त्व अधोरेखित करते.माझ्या मते,गेल्या अनेक वर्षातील ही सर्वोत्कृष्ट संकल्पना आहे.
Scroll to Top